१५ ऑगस्ट २०१४ रोजी आपल्या शब्द खड्ग वृत्तपत्राची स्थापना झाली. सुरुवातीला शब्द खड्ग प्रिंट स्वरूपात निघत होते. समाजाच्या सर्वच अंगाला स्पर्श करणाऱ्या बातम्या आपण यात छापीत होतो.. मात्र, नंतरच्या काळात आलेल्या कोरोनाने बळजबरीने अगदी सगळ्यांच्याच जगण्याला ब्रेक लावला..
हा काळ खूप कठीण होता. नंतर मात्र, वरिष्ठ संपादक जे मला पत्रकारितेला शिकवायला होते आणि माझे काही हितचिंतक मित्र या सर्वांच्या सल्ल्याने आपला पेपर डिजिटल स्वरूपाचा केला. केंद्रसरकारच्या वृत्तपत्र विभागाकडे आपली नोंदणी आहेच. त्याचबरोबर गुगल सोबत नोंदणी केली असल्याने आपला पेपर मराठी, हिंदी आणि इंग्रजी स्वरूपात अगदी चोवीस तास ऑनलाईन प्रकाशित होत आहे. त्याच बरोबर आपण आपल्या वृत्तपत्रात व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा टाकू शकतो. आपलं शब्द खड्ग युट्युब चॅनेल सुद्धा आहे.. आपण आपल्या पेपर मध्ये अगदी सर्व सदरं चालवीत आहोत.. अगदी तुम्ही म्हणाल ते आपल्या वृत्तपत्रात छापून आणण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही आमच्या बरोबर इतरांनाही शब्द खड्ग मध्ये फुलवीत आहोत.. आजवर आपण गोरगरिबांचे प्रश्न हाताळीत आलेले आहोत त्याचबरोबर तृतीयपंथी, कृष्ठरोग पीडित, बेवारस प्रेतं, परित्यक्ता, विधवा, शिक्षण, आरोग्य, पोलिसांसाठी विविध कार्यक्रम, पोलिसांसाठी पथनाट्य, शॉर्टफिल्म लेखन आणि दिग्दर्शन, शूटिंग, कथाकथन, नवकवींना प्रोत्साहन देण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात काव्योत्सव, आरोग्य शिबीर, नवोदित गायकांना आणि धुणीभांडी करणाऱ्या महिलांना स्टेज मिळावा म्हणून कराओके गाण्याचे कार्यक्रम..
महिलांचे आणि समाजात विशेष कार्य केलेल्या पुरुषांचे सत्कार, वृद्धांचे सत्कार, अनाथाश्रम, वृद्धाश्रमांची कामे, पत्रकारिता प्रशिक्षण, लहान मुले तथा मानसिकदृष्ट्या कमकुवत मुलांसाठी कार्य, विविध विषयांवर व्यख्याने.. महिलादिनी कार्यक्रम, खेळाडूंना प्रोत्साहन, रस्त्यावरचं जिणं म्हणजेच रस्त्यावर प्रामाणिकपणे काम करून पैसे कमविणाऱ्या लोकांना प्रसिद्धी देणे, शिक्षकांचे सत्कार, फोटोग्राफर लोकांना प्रोत्साहन, सौन्दयस्पर्धा, अभिवाचन मार्गदर्शन, गाण्याचे अल्बम करणे, वक्तृत्व कला.. इत्यादी इत्यादी सर्व.. आणि वुत्तपत्रात ज्या रोज वाचायला मिळतात त्या आपले शहर, राज्य आणि देश विदेशातील सर्व बातम्या आपण आपल्या शब्द खड्ग मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीत देत असतो. काही वेळा आपण आपल्या वृत्तपत्रात या गोष्टींचे आणि गाण्यांचे व्हिडिओ सुद्धा पोस्ट करतो.. आपल्या वृत्तप्रत्राच्या माध्यमातून आपण अनेकांना लिहिते बोलते करीत आहोत.. आपली शब्द खड्ग टीम सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्याला जबरदस्त सहकार्य करते.. अशा प्रकारे जे जे शक्य आहे ते ते करण्याचा आपला प्रयत्न असतो आणि तो कायम राहील.. जर आपल्यापैकी कुणाला आमच्यासोबत काम करायचे असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.