व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही.. CJP सूर्य कांत.. आंदोलकांच्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीस नकार..

न्यायालयाने, "आमचा वेळ वाया घालवू नका. आम्हाला कोणतेही व्हिडीओ पाहायचे नाहीत," असे सांगत सुनावणीची मागणी फेटाळली. नवी दिल्ली : दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईविरोधातील याचिकेची तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. २२) नकार दिला. सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी पोलिस कारवाईचे व्हिडीओ न्यायालयासमोर सादर करण्याची तयारी दर्शवली असता, "व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही," असे स्पष्ट शब्दांत सांगत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी तातडीच्या सुनावणीची मागणी फेटाळून लावली..

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल.

पीटीआयच्या वृत्तानुसार, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कथित अत्याचार झाल्याचा आरोप करत त्यासंदर्भातील व्हिडीओ उपलब्ध असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच, ही याचिका गुरुवारी (दि. २३) तातडीने सुनावणीस घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली. ही बाब सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आली.

54

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.