इराणच्या चाबहार बंदरावर अमेरिकेचा मोठा हल्ला; भारताची चाबहारमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक..

अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या १७ दिवसांपासून युद्ध सुरू असतानाच भारताने कोट्यवधी रुपयांची महागुंतवणूक केलेल्या इराणच्या चाबहार बंदरावर अमेरिकेने मोठा हल्ला केला आहे. अमेरिकन लढाऊ विमानांनी इराणच्या चाबहार व्यापार क्षेत्राजवळील एका डोंगरावर असलेल्या लष्करी तळांवर हल्ला केल्याचे वृत्त आहे..

खर्ग बेटानंतर अमेरिकेने इराणच्या चाबहार बंदरावर मोठा हल्ला केला. अमेरिकन लढाऊ विमानांनी व्यापार क्षेत्रातील लष्करी छावण्यांना लक्ष्य केले आहे. व्यापार क्षेत्रात स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. याशिवाय धुराचे प्रचंड लोटही दिसत होते. हल्ल्यांमुळे चाबहार बंदर परिसरात मोठे नुकसान झाल्याची भीती वर्तवली जात आहे. चाबहार बंदराजवळ झालेल्या हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अमेरिकन विमाने बंदराच्या व्यापार क्षेत्राजवळ घिरट्या घालत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

इराणचे चाबहार बंदर भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. पश्चिम आशिया आणि युरोपशी व्यापार करण्यासाठी भारत या बंदराचा वापर करतो. गेल्या अनेक वर्षांपासून भारत सरकारने या बंदराच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.

यूएईकडून १९ भारतीयांना अटक

अबू धाबी : मध्य पूर्वमध्ये चालू संघर्षादरम्यान तणावाशी संबंधित बनावट फुटेज आणि कथा प्रसारित करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअऱ केल्याच्या आरोपाखाली यूएईने १९ भारतीयांसह ३५ जणांना अटक केली आहे. ही कारवाई दोन भागांमध्ये करण्यात आली आहे.

70

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.