खर्ग बेटावर अमेरिकेचा हल्ला; इराणचे सर्व लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याचा ट्रम्प यांचा दावा..

इराणमधील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या खर्ग बेटावर अमेरिकेच्या लष्कराने सर्वात मोठा हल्ला केला असून तेथे असलेले सर्व लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, हा हल्ला अमेरिकेच्या सेंट्रल कमांडद्वारे केल्याचे म्हटले असून इराणकडून निर्माण होणारा धोका संपुष्टात आणणे हे या हल्ल्याचे उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे..

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर मध्यपूर्वेच्या इतिहासातील सर्वात नमूद केले की, हा हल्ला शक्तिशाली बॉम्बहल्ल्यांच्या मोहिमांपैकी एक होता. अमेरिकन लष्कराने 'खर्ग' बेटावर स्थित असलेल्या सर्व लष्करी तळांना लक्ष्य केले आणि त्यांचा पूर्णपणे विध्वस केला. मात्र, ऊर्जेचा पुरवठा विस्कळीत होऊ नये या उद्देशाने अमेरिकेने बेटावरील तेलविषयक पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे जाणीवपूर्वक टाळले, असेही त्यांनी स्पट केले.

हॉर्मुझबाबत ट्रम्प यांचा इशारा

ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर इराण किंवा अन्य कोणत्याही देशाने हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीत अडथळा निर्माण केला, तर अमेरिका आपली भूमिका बदलू शकते. अशा परिस्थितीत, अमेरिका त्या बेटावरील तेलविषयक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचाही विचार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

51
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.