अमेरिकेत ११ भारतीयांवर व्हिसा फसवणुकीचा आरोप; ग्रीन कार्डसाठी रचला बनावट दरोड्याचा कट..

अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या ११ भारतीय नागरिकांवर व्हिसा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तींनी दुकानांमध्ये बनावट सशस्त्र दरोडे घालण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या संशयितांनी बनावट दरोड्यांची योजना आखली होती..

यामागचा उद्देश असा होता की, दुकानातील कर्मचारी इमिग्रेशन अर्जामध्ये खोटा दावा करू शकतील की, ते एखाद्या गुन्ह्याचे बळी ठरले होते, ज्यामुळे त्यांना ग्रीन कार्ड मिळवणे सोपे होईल, असा यामगील उद्देश होता. या प्रकरणातील आरोपींची नावे जितेंद्रकुमार पटेल (३९), महेशकुमार पटेल (३६), संजयकुमार पटेल (४५), दीपिकाबेन पटेल (४०), रमेशभाई पटेल (५२), अमिताभहेन पटेल (४३), रौनककुमार पटेल (२८), संगीताबेन पटेल (३६), मिंकेश पटेल (४२), सोनल पटेल (४२) आणि मितुल पटेल (४०) अशी असून यांच्याविरुद्ध व्हिसा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुरुंगवास, दंड..

या प्रकरणातील रामभाई आणि त्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या चालकावर यापूर्वीच आरोप ठेवून त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. शुक्रवारी ज्या ११ जणांवर आरोप करण्यात आले आहेत, त्यांच्यावर प्रत्येक दरोड्याची योजना आखण्यात मदत केल्याचा किंवा स्वतःला, कुटुंबातील सदस्यांना पीडित म्हणून दाखवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप आहे. व्हिसा फसवणुकीच्या कटाचा आरोप सिद्ध झाल्यास ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा २,५०,००० अमेरिकन डॉलरपर्यंत दंडाची तरतूद आहे.

42

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.