केंद्र सरकारच्या तात्पुरत्या बंदीनंतर प्ले स्टोअरवर Telegram पुन्हा सुरू; पण ॲप स्टोअरवरून अजूनही गायब आहे..

पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारने तात्पुरती बंदी घातलेले मेसेजिंग ॲप टेलिग्राम (Telegram) आता काही युजर्ससाठी पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मात्र, टेलिग्राम ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध नसल्याने अनेकांना ते डाउनलोड करता येत नसून, काही युजर्सना अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे..

आठवड्यानंतर Telegram पुन्हा सुरू

नीट पुनर्परीक्षेपूर्वी केंद्र सरकारने Telegram वर तात्पुरती बंदी घातली होती. या बंदीनंतर जवळपास आठवडाभराने मंगळवारी (दि. २३) काही युजर्ससाठी Telegram ची सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, सर्वच युजर्सना हे ॲप सुरू करता येत नसून अनेकांनी ते वापरताना अडचणी येत असल्याची तक्रार केली आहे. 

गुगलने टेलिग्राम पुन्हा प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. मात्र ॲपल ॲप स्टोअर वर हे ॲप अजूनही हटवलेलेच आहे. काही आयफोन युजर्स टेलिग्राम वापरू शकत असले तरी अनेकांना त्यांच्या जुन्या मेसेजपर्यंत पोहोचता येत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

49

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.