डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश लक्ष्मण पवार चक्क खुनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगार..

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांवरील हल्ल्यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अत्यंत संवेदनशील घटनेला आता एक धक्कादायक आणि गंभीर वळण मिळाले आहे. या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिकांना बेदम मारहाण करणाऱ्या मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या ५० वर्षीय रमेश लक्ष्मण पवार याची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड झाली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळबळ उडाली आहे. हा वादग्रस्त आरोपी शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा अत्यंत जवळचा आणि निष्ठावंत साथीदार म्हणून ओळखला जातो.

पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, आरोपी रमेश लक्ष्मण पवार हा डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील वडारवाडी भागात वास्तव्यास आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी झालेल्या एका अत्यंत गंभीर खुनाच्या गुन्ह्यात या आरोपीला थेट सहा वर्षे तुरूंगवासाची कठोर शिक्षा झाली होती. आपली पूर्ण शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर पडल्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नव्हती. तो सातत्याने नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या दावणीला बांधलेला होता. एवढेच नव्हे तर खुनाच्या गुन्ह्यात थेट शिक्षा झालेला हा गुन्हेगार चक्क कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा (केडीएमसी) अधिकृत ठेकेदार बनून कोट्यवधींची कामे लाटत होता, ही अत्यंत संतापजनक माहिती विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या कसून केलेल्या चौकशीदरम्यान समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या वजनामुळे आणि विशेष शिफारशीमुळे या गुन्हेगाराला केडीएमसीची गटारे दुरुस्त करणे तसेच पायवाटा बनवण्याची विविध कामे सहज मिळत होती. डोंबिवली पश्चिमेतील कोपर आणि शास्त्रीनगर या प्रमुख भागांसह इतर अनेक ठिकाणी नगरसेवक निधी आणि मूलभूत सोयी-सुविधांच्या निधीतून दिली जाणारी सार्वजनिक कामे तो करत होता. पूर्वी तो मजूर कामगार सोसायटीच्या माध्यमातून सक्रिय होता. तुरूंगवासामुळे त्याच्या या कामात काही काळ खंड पडला होता, परंतु गेल्या दोन वर्षांपासून त्याने पुन्हा आपले जाळे निर्माण केले होते. महापालिकेच्या प्रभाग कार्यालयापासून थेट मुख्य मुख्यालयापर्यंत त्याची सातत्याने मोठी उठबस असायची.

डॉक्टरांना मारहाण प्रकरणातील या सर्व मुख्य गुन्हेगारांच्या अटकेमुळे डोबिवलीकर खुश झाले आहेत..

65

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.