डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणात कल्याण कोर्टाने आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 रोजी २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे..
या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे..
सह-आरोपींनाही कोठडी: रमेश म्हात्रे यांच्यापूर्वी अटक करण्यात आलेल्या त्यांच्या इतर तीन साथीदारांना (रमेश पवार, अक्षय कारंडे आणि प्रमोद निकम) देखील न्यायालयाने आधीच २ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.
थेट न्यायालयात हजेरी: प्रकृती अस्वास्थ्यामुळे म्हात्रे हे ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यांच्या वकिलांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची मागणी केली होती, परंतु कोर्टाने ती फेटाळून लावत म्हात्रे यांना प्रत्यक्ष हजर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच पोलिसांनी त्यांना कडेकोट बंदोबस्तात कल्याण कोर्टात हजर केले आणि न्यायालयाने त्यांची २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली..
गंभीर कलमे:
या प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर सरकारी कामात अडथळा आणणे, डॉक्टरांना मारहाण करणे आणि थेट जीवे मारण्याचा प्रयत्न करणे यांसारखी अत्यंत गंभीर कलमे लावली आहेत..
डॉक्टरांना मारहाण या प्रकरणाची फक्त महाराष्ट्र राज्यातच नाही तर संपूर्ण भारत देशात निंदा होत आहे व कधी नाही तो मीडियाने या बातम्या दिल्या असल्याने रमेश म्हात्रे गोत्यात आले आहेत. ते शिंदे सेनेचे नगरसेवक आहेत. मात्र, शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे स्वतः डॉक्टर असल्याने व ते कल्याण - डोंबिवली विभागाचे खासदार असल्याने त्यांना सुद्धा या मारहाण प्रकरणात म्हात्रे यांची बाजू घेतली नाही. म्हात्रेंची बाजू घेणे शिंदेंना परवडणारे नाही. म्हात्रे यांचे बोटावर मोजण्या इतके समर्थक जरी त्यांची बाजू घेत असले तरी कल्याण - डोंबिवलीकरांना म्हात्रे यांची गुंडगिरी आणि दहशत ठाऊक असल्याने म्हात्रेंवर कडक कारवाई होऊन त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे अशी मागणी स्थानिक जनता करीत आहे..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.