ठाणे जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीत ३१ जणांचा मृत्यू; २३ जण जखमी, भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १५ बळी..

यंदा मान्सूनला सुमारे महिनाभर उशिराने सुरुवात झाली असली, तरी जुलै महिन्याच्या प्रारंभी झालेल्या मुसळधार पावसाने ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत केले..

विजांचा कडकडाट, सोसाट्याचे वारे आणि संततधार पावसामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक सखल भाग जलमय झाले. अनेक वस्त्या आणि वाड्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे लागले. या नैसर्गिक आपत्तींमध्ये जिल्ह्यात आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाल्याची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक १५ मृत्यू भिवंडी तालुक्यात झाले असल्याची माहिती शासकीय आकडेवारीतून समोर आली आहे.

मागील वर्षी कल्याण तालुक्यात सर्वाधिक मृत्यू

शासकीय आकडेवारीनुसार, यंदाच्या नैसर्गिक आपत्तींमध्ये भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल ठाणे तालुक्यात ५, मुरबाडमध्ये ४, शहापूरमध्ये ३, तर मीरा-भाईंदर आणि अंबरनाथ येथे प्रत्येकी २ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमध्ये एकूण २३ जण जखमी झाले आहेत. तुलनेने, मागील वर्षी १ मे २०२५ ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यात २७ जणांचा मृत्यू झाला होता, तर १२ जण जखमी झाले होते.

50
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.