डोंबिवलीत पी.ए.सी.एल. (पल्स) कंपनीच्या गुंतवणूकदार व एजंटांसाठी सहाय्यता केंद्र सुरू..

डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग व व्यापारी विभाग) यांच्या डोंबिवली येथील कार्यालयामध्ये जनलोक प्रतिष्ठान सामाजिक, मुंबई कृती समिती यांच्या वतीने पी.ए.सी.एल. (पल्स) कंपनीच्या गुंतवणूकदार व एजंटांसाठी सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले आहे..

या सहाय्यता केंद्राच्या माध्यमातून पी.ए.सी.एल. (पल्स) कंपनीच्या गुंतवणूकदारांना आवश्यक मार्गदर्शन, Investor Information Form भरण्यास मदत, आवश्यक कागदपत्रांची माहिती तसेच संबंधित तक्रारींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे हजारो गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना एकाच ठिकाणी आवश्यक सहाय्य उपलब्ध होणार आहे.

या सहाय्यता केंद्राचे संपर्क व्यक्ती श्री. सचिन कडलक (मो. 8291251306) हे असून, नागरिकांनी कोणत्याही अडचणीसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी श्री. शाम नाना चौगले (ज्येष्ठ समाजसेवक) आणि श्री. अश्विन हेमंतकुमार केळकर (मुंबई विभाग अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – उद्योग व व्यापारी विभाग) यांनी संयुक्तपणे सांगितले की, "पी.ए.सी.एल. (पल्स) कंपनीच्या गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन व आवश्यक मदत मिळावी, या उद्देशाने हे सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले असून जास्तीत जास्त गुंतवणूकदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा."

या उपक्रमासाठी श्रीकांत कदम (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – उद्योग व व्यापारी विभाग), श्री. अभिजीत आपटे (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – उद्योग व व्यापारी विभाग), प्रा. दिपक जाधव (मुंबई विभाग सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – उद्योग व व्यापारी विभाग), श्री. व्यंकटेश नायडू (कल्याण-डोंबिवली शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – उद्योग व व्यापारी विभाग) तसेच श्री. उदयराज तळेकर (मुंबई विभाग उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – उद्योग व व्यापारी विभाग) यांनी विशेष सहकार्य करून या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला.

हे सहाय्यता केंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग व व्यापारी विभाग) यांच्या डोंबिवली येथील कार्यालयात कार्यरत असून, पी.ए.सी.एल. (पल्स) कंपनीच्या सर्व गुंतवणूकदार व एजंटांनी आवश्यक कागदपत्रांसह भेट देऊन या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनलोक प्रतिष्ठान सामाजिक, मुंबई कृती समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

70
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.