मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी पूर्ण न केलेल्या महिलांना यापुढे लाभ दिला जाणार नाही. मात्र, निकष पूर्ण करत पात्र ठरलेल्या सुमारे १ कोटी ७० लाख महिलांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली..
या संदर्भात शब्द खड्ग ने काही महिलांशी संवाद साधला असता अगोदर सरकारने हे महिलांना पैशाचे गाजर दाखविले आणि आम्ही फसलो असे स्पष्टपणे सांगितले. फक्त निवडून येण्यापुरता या सरकारने आमचा वापर करून घेतला असे सांगितले. तर काही महिलांनी केवळ पैशाच्या लालसेपोटी आम्ही चांगल्या लोकांना निवडणुकांमधून पराभूत केले ही आमची चूक झाली असे मेनी करून या सरकारने इतकी महागाई करून ठेवली आहे की जगणे मुश्किल झाले आहे..
महाराष्ट्राप्रमाणे देशातील इतर कोणत्याही राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांना थेट आर्थिक मदत दिली जात नसून ही देशातील सर्वात मोठी महिला कल्याण योजना असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यातील तब्बल ८० लाख महिलांना ई-केवायसी प्रक्रियेनंतर अपात्र करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी योजनेची वस्तुस्थिती सांगत गोंधळावर पडदा टाकला.
“योजना सुरू करताना महिलांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ लागणार असल्याने स्व-घोषणापत्राच्या आधारे अर्ज स्वीकारण्यात आले होते. केवायसी मोहीम राबवून विविध विभागांच्या डेटाबेसशी पडताळणी केली. केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना यापुढे पैसे दिले जाणार नाहीत. मात्र, यापूर्वी त्यांना देण्यात आलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.