जूनपासून भाडेवाढ लागू , वाढत्या महागाईत पालकांच्या खिशाला कात्री..
पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी पाठोपाठ आता शालेय बस शुल्कातही १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय शालेय बस मालक संघटनेने (एसबीओए) घेतला आहे. ही दरवाढ जून २०२६ पासून लागू होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी जाहीर केले आहे. यामुळे वाढत्या महागाईत पालकांच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे.
शालेय बस व्यवसायासमोरील आर्थिक अडचणींबाबत उपाययोजना करण्याबाबत स्कुल बस संघटनेने राज्य शासन आणि राज्य परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. या माध्यमातून संघटनेने बस शुल्कवाढ टाळण्यासाठी पर्यायी उपाय सुचविले होते. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस मदत किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने शुल्कवाढीचा निर्णय घेणे अपरिहार्य ठरल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. मात्र जर स्कुलबस शुल्क वाढविले तर बरेचसे विद्यार्थी प्रवासासाठी वेगळा पर्याय निवडतील व स्कुलबस व्यवसाय धोक्यात येईल अशी भीती या व्यवसायातील लोक व्यक्त करीत आहेत..
शासनाकडून आवश्यक मदत न मिळाल्यास शालेय वाहतूक संपूर्णपणे धोक्यात येईल असे सांगतांना शासन आणि पालकांनी सहकार्य करावे असे वाहतूक संघटना म्हणत आहे. विमान प्रवास सुद्धा महागला आहे. एका गोष्टीच्या वाढीचा दुसऱ्या गोष्टीवर सुद्धा प्रभाव पडत असल्याने सर्वसामान्य पालक तथा मध्यमवर्ग सरकारवर खूप नाराज आहे..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.