राज्यात गॅस, इंधनाचा पुरेसा साठा आहे; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे भुजबळांचे आवाहन..

राज्यात घरगुती एलपीजी गॅस आणि इंधनाचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत अनेक संभ्रम तसेच अफवा पसरवल्या जात असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे..

राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी ९ हजार मेट्रिक टन असताना उत्पादन वाढवून ते ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत नेले आहे. मार्च महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलिंडर उपलब्ध आहेत.

पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील, याबाबत नागरिकांनी निश्चित राहावे, असे भुजबळ यांनी 'एक्स'वरून सांगितले.

सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून

गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. रुग्णालये, शाळा, आश्रमशाळा आणि अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठा प्राधान्याने मिळेल, याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही तांत्रिक अडचणी किवा तक्रारींसाठी तालुका तसेच जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष आणि व्हॉट्सॲप सुविधा तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुरवठा विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ  यांच्या वक्तव्यावर सर्वसामान्यांची प्रतिक्रिया.. 

सर्वसामान्य लोकांना घरगुती गॅस या प्रकरणावर छेडले असता शंभर टक्के लोक असे म्हटले की, जर गॅसची एवढीच टंचाई नाही तर मग गॅस मागे ६०/६५ रुपयांची भाववाढ का केली ?? आणि सिलेंडर मिळायला 25 दिवसांपेक्षा जास्त अवधी का लागतोय ?? लोक ब्लॅकने गॅस शोधू लागलेत ?? हॉटेलवाले हवालदिल झाले आहेत. बऱ्याच खाण्याच्या हातगाड्या आणि काही हॉटेल बंद पडू लागली आहेत.  छगन भुजबळ आणि मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर द्यावे.. इराण वरून जहाजे निघाली आहेत असे गोडी मीडिया जरी म्हणत असले तरी त जहाजे कुठे अडकून पडलीत याचे ही उत्तर मोदी साहेबांनी द्यावे.. थोडक्यात काय तर लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन गॅस महाग केला असेही लोक आता रोखठोक बोलत आहेत..

37

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.