SSC HSC Time Table 2027 Maharashtra : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर! बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार. कोणत्या विषयाचा पेपर कधी? पाहा संपूर्ण माहिती..
दहावीचे महत्त्वाचे पेपर कधी?
१५ फेब्रुवारी २०२७ - प्रथम भाषा (मराठी, हिंदीसह)
२२ फेब्रुवारी २०२७ - इंग्रजी (प्रथम किंवा तृतीय भाषा)
२४ फेब्रुवारी २०२७ - हिंदी (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
२ मार्च २०२७ - गणित भाग १ (बीजगणित)
४ मार्च २०२७ - गणित भाग २ (भूमिती)
८ मार्च २०२७ - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
११ मार्च २०२७ - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
१३ मार्च २०२७ - इतिहास व राज्यशास्त्र
१५ मार्च २०२७ - भूगोल
बारावीचे महत्त्वाचे पेपर कधी?
८ फेब्रुवारी २०२७ - इंग्रजी
९ फेब्रुवारी २०२७ - हिंदी
१० फेब्रुवारी २०२७ - मराठी
१२ फेब्रुवारी २०२७ - भौतिकशास्त्र
१३ फेब्रुवारी २०२७ - वाणिज्य संघटन व व्यवस्थापन
१६ फेब्रुवारी २०२७ - रसायनशास्त्र
१७ फेब्रुवारी २०२७ - अर्थशास्त्र
२० फेब्रुवारी २०२७ - गणित आणि संख्याशास्त्र
२३ फेब्रुवारी २०२७ - जीवशास्त्र
विद्यार्थ्यांनी वेळापत्रक कुठे पाहायचं?
दहावी आणि बारावीच्या सर्व विषयांचं सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. बारावीच्या सर्वसाधारण आणि व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र वेळापत्रकं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमानुसार योग्य वेळापत्रक पाहावं.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahahsscboard.in
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.