हरमनप्रीतकडे भारताचे कर्णधारपद कायम; ऑगस्टमध्ये रंगणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पुरुष संघ जाहीर..

आगामी एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी २० सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून स्टार ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. १४ ते ३० ऑगस्ट दरम्यान बेल्जियम व नेदरलँड्स येथे संयुक्तपणे पुरुषांच्या १६व्या विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे..

नवी दिल्ली : आगामी एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी २० सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून स्टार ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. १४ ते ३० ऑगस्ट दरम्यान बेल्जियम व नेदरलँड्स येथे संयुक्तपणे पुरुषांच्या १६व्या विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे.

भारतीय संघसाठी नुकतीच झालेली प्रो लीग निराशाजनक ठरली होती. नऊ संघांच्या या स्पर्धेत भारताने चार विजय, पाच ड्रॉ आणि सात पराभवांसह आठवे स्थान मिळवले होते. आता भारतीय संघ विश्वचषकातील आपली कामगिरी सुधारण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. भारताने १९७५ मध्ये एकमेव विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर भारताला पदक मिळवता आलेले नाही. यापूर्वी भारताने १९७१मध्ये कांस्य, तर १९७३मध्ये रौप्यपदक जिंकले होते. मुख्य म्हणजे गेले दोन विश्वचषक (२०१८, २०२३) भारतातच झाले होते. मात्र दोन्ही वेळेस भारताला उपांत्यपूर्व फेरीपुढे जाण्यात अपयश आले.

भारतीय संघ

हरमनप्रीत सिंग (कर्णधार), मोहित एच. एस., सूरज करकेरा, जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमीत, यशदीप सिवाच, रजिंदर सिंग, आदित्य लालगे, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, निलकांता शर्मा, विवेक प्रसाद, दिलप्रीत सिंग, शिलानंद लाक्रा, सुखजीत सिंग, मंदीप सिंग, अभिषेक.

37
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.