या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शब्द खड्ग डिजीटल वृत्तपत्राचे संपादक प्रा दिपक जाधव सर, सरस्वती विद्यामंदीर च्या कार्यवाह सौं सप्रे मॅडम उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी UMAC संस्थेचे अध्यक्ष सुनील शंकर वडके सर होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
डोंबिवली येथे युनिटी मार्शल आर्ट सेंटर (युमॅक ) या संस्थेच्या UMAC पालक वर्ग यांच्या वतीने आळंदी, अहिल्या नगर, आणि आसाम येथे झालेल्या कराटे कॉम्पिटिशन आणि मर्दानी खेळ मध्ये विजेत्या खेळाडूंचा सत्कार सोहळा डोंबिवली पश्चिम येथे सरस्वती शाळेत उत्साहात संपन्न झाला..
प्रमुख पाहुणे श्री. दिपक जाधव सर यांचे उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. आपल्या मनोगतात प्रा. दिपक जाधव यांनी मुलांनी आणि पालकांनी अभ्यासाबरोबर मैदानी खेळाचा पण विचार केला पाहिजे, एखादा मैदानी खेळ मुलांना रोजगार म्हणजेच चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवून देण्यास मदत करू शकतो ह्या बद्दल थोडक्यात आणि महत्वाचे समजावले. तसेच, प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुलांनी खेळा मधे नम्रता ठेवावीं गुरु वरती विश्वास ठेवावा यावर प्रकाश टाकला..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोच सचिन चौधरी यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ युगंधरा परदेशी , सौ सारिका मांजरेकर, सौ ऋचा घाडीगावकर यांनी केले.UMAC पालक परिवाराच्या सौ.सुमिता सुनिल वडके, सौं दिपाली घुमरे, सौं कांचन लिंगायत, सौं प्रतिभा कड, सौं श्रावणी मिरजकर यांनी आसाम च्या कॉम्पिटिशनच्या वेळी सहकार्य केले होते त्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पागूच्छ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आळंदी-
गोल्ड -14 सिल्वर 13 ब्रॉन्झ 20
अहिल्यानगर - गोल्ड-8,सिल्वर-7.ब्रॉन्झ- 3
आसाम
गोल्ड-20, सिल्वर-7, ब्रॉन्झ-8
सर्व कराटे पट्टू च्या या उत्कृष्ट कामगिरी मागे UMAC चे संस्थापक आणि ग्रॅण्ड मास्टर सुनील वडके यांच्या मार्गदर्शनाखाली कोच राजेश मोरे, सचिन चौधरी आणि प्रमुख पाहुणे, आणि पालक वर्ग यांनी खेळाडूंना उज्वल भविष्यकरिता शुभेच्छा दिल्या..
- दिनकर सोमासे. फोटोग्राफर शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.