ऑगस्ट महिन्यात घरगुती जेवणाचा खर्च किरकोळ वाढल्याचे एका अहवालात मंगळवारी स्पष्ट करण्यात आले..
मुंबई : ऑगस्ट महिन्यात घरगुती जेवणाचा खर्च किरकोळ वाढल्याचे एका अहवालात मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. स्वदेशी क्रेडिट रेटिंग एजन्सी ‘क्रिसिल’च्या संशोधन शाखेच्या मासिक अहवालानुसार, शाकाहारी थाळीची किंमत वर्षानुवर्ष आणि महिनानुमहिना १ टक्क्याने - ₹२९.५ ने वाढली आहे.
‘क्रिसिल इंटेलिजन्स’च्या अहवालानुसार, मांसाहारी थाळीच्या बाबतीत, ब्रॉयलर कोंबडीच्या किमतीत १० टक्क्यांची वाढ झाल्यामुळे थाळीचा खर्च वर्षानुवर्ष ५ टक्क्यांनी ₹५७.५० ने वाढली आहे. तथापि, जुलै महिन्यातील ₹ ५८.३० ने वाढीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये खर्च एका टक्क्याने कमी झाला आहे.
श्रावण महिन्याचा प्रभाव
महिन्याच्या तुलनेत कांद्याच्या किमतीत १७ टक्क्यांची मोठी वाढ झाली. परंतु टोमॅटोच्या दरात ७ टक्क्यांची घसरण झाल्यामुळे त्याचा प्रभाव मर्यादित राहिला.
हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यामुळे ब्रॉयलर कोंबडीच्या किमतीत ४ टक्क्यांची घसरण झाली. यामुळे मांसाहारी थाळीच्या किमतीत महिन्याच्या तुलनेत १ टक्क्याची घट झाली.
किंमत वाढण्यास कारण की...
थाळीचा खर्च वाढताच : बटाटे आणि टोमॅटोच्या किमतीत घसरण झाली असली तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत कांदा, खाद्यतेल, तांदूळ आणि एलपीजीचे दर वाढल्याने थाळीचा खर्च वाढलेलाच राहिला, असे ‘रोटी राइस रेट’ अहवालात म्हटले आहे.
कांद्याचे दर : मार्च-एप्रिलमध्ये महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पुरवठा कमी झाला. परिणामी, ऑगस्ट २०२६ मध्ये कांद्याचे दर गेल्या वर्षीच्या ₹२८ प्रति किलोवरून ४३ टक्क्यांनी वाढून ₹४० प्रति किलो झाले.
इतर घटकांमधील वाढ : खाद्यतेलाच्या दरात ११% आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात १०% वाढ झाली.
किमतींवर नियंत्रण ठेवणारे घटक : बटाट्याच्या दरात १२% आणि टोमॅटोच्या दरात २८% घसरण झाल्यामुळे थाळीच्या एकूण खर्चातील मोठी वाढ रोखण्यास मदत झाली.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.