अण्णा हजारे यांना भेटणार का या प्रश्नावर अभिजतचे सडेतोड उत्तर..
कॉकरोच जनता पार्टी चा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा मागितलेला राजीनामा प्रकरण आणि त्यासाठी कॉकरोच करीत असलेले आंदोलन आणि उपोषण सध्या फक्त देशातच नाही तर विदेशातही गाजत आहे. अभिजीतने जेन झी एकत्र केल्याने व विद्यार्थी शिक्षण, पेपर फुटी प्रकरण तथा तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न उचलून धरल्याने अभिजीतच्या इंस्टाग्राम हँडलवर काँग्रेस आणि भाजप पेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत.
पत्रकारांनी अण्णा हजारे यांना भेटणार का असा प्रश्न अभिजीतला विचारला असता ज्यांचं वय साठ - सत्तर झालं आहे त्यांनी निवृत्त होऊन आश्रमात बसावं. ज्येष्ठ मंडळी त्यांचं आयुष्य जागून बसलेले आहेत म्हणून आता तरुणांना स्वतःच्या भविष्याचा निर्णय घेऊ द्यावा असे अभिजित स्पष्ट बोलल्याने यावर तर्कवितर्क काढले जाऊ शकतात. मात्र, सर्वसामान्य लोक आणि तरुणांच्या मते अभिजित योग्य तेच बोलला आहे व तरुणांना स्वतःचे निर्णय घेऊ द्यावेत असेही लोक बोलत आहेत..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.