कुख्यात गुंड हिमांशू भाऊ अमेरिकेत जेरबंद..

भारतामधील सर्वाधिक वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक आणि हरयाणामधील कुख्यात गुंड हिमांशू भाऊ याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या 'इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट' (आयसीई) यंत्रणेने हिमांशू भाऊ आणि त्याच्या एका साथीदाराला नेवाडा येथे ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे..

वॉशिंग्टन : अमेरिकन सरकारच्या ऑनलाइन डिटेन्यू लोकेटरनुसार, हिमांशू सिरोहो आणि नीरज कौशिक या दोन भारतीय वंशाच्या व्यक्ती नेवाडा येथील लास वेगासजवळ असलेल्या हेंडरसन् डिटेंशन सेंटरमध्ये आयसीईच्या ताब्यात आहेत. लास वेगासमधील ऑपरेशन्स' आयसीईच्या 'एन्फोर्समेंट अँड रिमूव्हल कार्यालयामार्फत या प्रकरणाची कागदपत्रे आणि कार्यवाही हाताळली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या या दोन व्यक्ती म्हणजे हिमांशू भाऊ आणि त्याचा साथीदार नीरज फरीदपुरिया हे आहेत. मूळचा हरयाणामधील रोहतक येथील असणारा आणि 'हिमांशू रिटोलिया' या नावाने ओळखला जाणारा हिमांशू भाऊ हा ऑगस्ट २०२३ पासून इंटरपोलच्या 'रेड नोटिस'च्या कक्षेत होता. त्याच्यावर भारतात तब्बल १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

40

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.