भारतीय हवाई दलाचा अधिकारी अटकेत; लष्करी गुप्त माहिती केली लीक, पाकच्या 'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात फसला..

सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पाकिस्तानी गुप्तहेराने टाकलेल्या 'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात फसून लष्करी माहिती लीक केल्याप्रकरणी भारतीय हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे..

नवी दिल्ली: हवाई दल प्राधिकरणाने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी दिली.

या प्रकरणी ३० मे रोजी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध शासकीय गुप्तता कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. तपास पूर्ण झाल्यानंतर ३० जुलै रोजी सक्षम न्यायालयात आरोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी एका प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले.

हेरगिरी रॅकेट

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्याने लष्करी उपक्रमांशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण एका कथित हेरगिरी रॅकेटशी जोडलेले असून, सोशल मीडियावरून एका महिलेने संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधला होता. त्या महिलेने अधिकाऱ्याशी जवळीक साधून व्हिडिओ कॉल्स व इतर डिजिटल माध्यमांद्वारे संवाद सुरू ठेवला. ही महिला पाकिस्तानातील गुप्तचर संस्थांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

70
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.