दिल्लीतील जंतर-मंतरवर 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) मोर्चा..

दिल्लीतील जंतर-मंतरवर 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) हजारो आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता, सुरक्षा दल आणि पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यात अनेक विद्यार्थी व आंदोलक जखमी झाले. वाढत्या तणावामुळे पोलिसांनी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवत इंटरनेट सेवाही बंद केली आहे..

आंदोलनाची सविस्तर माहिती: संघर्ष: ३० ते ३५ हजार आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून संसदेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आरपीएफ (RPF) आणि पोलिसांनी गर्दी नियंत्रणासाठी बळाचा वापर केला..

राजकीय पाठिंबा: आंदोलनाचे गांभीर्य ओळखून खासदार चंद्रशेखर आझाद, महुआ मोईत्रा यांच्यासह अभिनेते प्रकाश राज आणि कुणाल कामरा यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि अतिशी यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे..

पार्श्वभूमी: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि पेपरफुटी विरोधात आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पोलिसांनी रविवारी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.

52

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.