सविस्तर वृत्त असे की, महसूल विभागातील कथित भ्रष्टाचार व अनियमिततेविरोधात उपोषणाला महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्ष सांगली जिल्हा कार्यध्यक्ष कॉ. वैभव काका पवार यांचा जाहीर पाठिंबा!
कडेगाव : कडेगाव महसूल विभागातील कथित भ्रष्टाचार व कामकाजातील अनियमिततेच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौक, कडेगाव येथे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी. एस. देशमुख (बापू), जीवन करकटे, भाऊसाहेब यादव, विजय यादव कॉ. विकास कदम मोराळकर आणि सुरेश मोहिते हे उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला विविध सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, संघटना आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून पाठिंबा मिळत असताना आज कॉ. नंदकुमार हतिकार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी कॉ. नंदकुमार हतिकार यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत महसूल विभागातील कथित भ्रष्टाचार, अनियमितता आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाची भूमिका जाणून घेतली. सामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दर्शविला.
कडेगाव महसूल विभागातील कामकाजाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित बाबींची चौकशी करावी आणि नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
कडेगावमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाला विविध स्तरांतून मिळणारा पाठिंबा वाढत असून, नागरिकांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या या संघर्षाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्ष कॉ. वैभव काका पवार आणि इतर सर्व पदाधिकारी यांनी हे प्रकरण उचलून धरल्याने निश्चितच महसूल विभागातील कथित भ्रष्टाचार व अनियमिततेचा बुरखा फाडला जाईल असा विश्वास लोकांना वाटतो आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.