कल्याण जिल्हा न्यायालयात हजेरी लावून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे आज (११ सप्टेंबर २०२६) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मुख्यालयात दाखल..
कोर्टात उपस्थिती: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी कल्याण सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले असून आज आरोप निश्चितीची सुनावणी होती. या सुनावणीसाठी रमेश म्हात्रे सकाळीच कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर
पुढील सुनावणी व प्रत्यक्ष खटला येत्या १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यावेळी केडीएमसीचे सचिव किशोर शेळके यांनी त्यांचं स्वागत केलं..
परिसरातील सर्वसामान्य लोकांनी हे पाहिल्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया नोंदविल्या. पालघरच्या डॉक्टरांना मारहाण केलेल्या शिंदे सेनेच्या घरात नावाच्या शहराध्यक्षाची उचलबांगडी करणारे एकनाथ शिंदे रमेश म्हात्रे यांना हात लावायला घाबरत आहेत का ? असा सवाल लोक उघडपणे विचारीत आहेत. रमेश म्हात्रे यांना काहीच होणार नाही कारण पोलिसांसह सर्व यंत्रणा त्यांच्या खिशात आहे असे ही लोक उघडपणे बोलत आहेत..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.