बुधवार 22 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक ८/५१ ला तानसा धरण भरून वाहू लागले. या धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत. आसपासचा परिसर आणि मुंबई महानगरपालिकेने समाधान व्यक्त केले आहे. मुंबईकरांची तहान हे धरण भागवीत असल्याने मुंबईकर सुद्धा सुखावले आहेत..
तानसा धरणा विषयी थोडक्यात माहिती :
तानसा धरण (Tansa Dam) हे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा नदीवर बांधण्यात आलेले एक प्रमुख गुरुत्वीय आणि मातीचे धरण आहे. हे धरण मुंबईला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या सात महत्त्वाच्या तलावांपैकी एक आहे.
धरणाची थोडक्यात माहिती:
स्थापना: हे धरण ब्रिटिश काळात १८९२ मध्ये बांधण्यात आले.
क्षमता: धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे १ लाख ४५ हजार दशलक्ष लिटर (सुमारे ४०,००० दशलक्ष गॅलन) इतकी आहे.
मुंबईला पाणीपुरवठा:
तानसा धरण मुंबईसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. हे धरण मुंबईला दररोज सुमारे ४१७ दशलक्ष लिटर (MLD) (किंवा अंदाजे २ कोटी गॅलन) एवढ्या पाण्याचा पुरवठा करते. धरणातून पाणी जलवाहिन्यांमार्फत मुंबईच्या भांडुप संकुलात आणले जाते आणि तेथे शुद्धीकरण करून संपूर्ण मुंबई शहराला व उपनगरांना पुरवले जाते.
- संजय खडपे. शब्द खड्ग महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.