रमेश म्हात्रे यांचे कपडे काढून धिंड काढण्याचे रोहित पवार यांचे डोंबिवली पोलिसांना आवाहन..

प्रियंका उगमाले या 33 वर्षीय महिलेचे प्रसूती प्रकरण.. 

डोंबिवलीतील केडीएमसीच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी बुधवार 8 जुलै 2026 रोजी दुपारी शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट देऊन आक्रमक भूमिका घेत, हल्लेखोर नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज संध्याकाळपर्यंत अटक करा, अन्यथा गुरुवारी महाविकास आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे..

याबाबत रोहित पवार यांनी खालील मुद्दे मांडले:डॉक्टरांचे समर्थन: एनआयसीयू (NICU) बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना परिस्थिती अत्यंत योग्य पद्धतीने समजावून सांगितली होती. तरीही सत्ताधारी पक्षातील एका पुरुष लोकप्रतिनिधीने (नगरसेवक रमेश म्हात्रे) येऊन महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली, ही अत्यंत निंदनीय बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे..

पोलिसांना सूचना: त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क करून, नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली असून, त्यांना अटक न केल्यास त्यांची भररस्त्यात कपडे काढून धिंड काढावी, अशा संतप्त सूचना पोलिसांना दिल्या आहेत।सदर प्रकरण घडल्यानंतर रोहित पवार यांनी स्वतः शास्त्रीनगर रुग्णालयात जाऊन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सादिया पिंजारी यांच्याकडून सर्व घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे। 

रुग्णसेवक  डॉक्टरांना एक नगरसेवक आई बहिणीवरून अर्वाच्य शिव्या देतो, डॉक्टरांच्या डोक्यात जीवघेण्या पद्धतीने फाईल मारीत असेल तर त्याच्या दारात पोलीस गाडी घेऊन जा व त्याची अंतर्वस्त्रावर धिंड काढा असे रोहित पवार म्हटले.. नेता, नगरसेवक, गुंड कुणीही असो तो जर असे वागत असेल तर त्याची अशाच प्रकारे धिंड काढा असे पवार म्हटले व या सरकारची अशा प्रकारची कारवाई करण्याची हिंमत आहे का असा ही सवाल त्यांनी सत्ताधारी सरकारला केला..

87
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.