विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज गुरुवार 18 जून रोजी मतदान..

बिनविरोध निवडणुकीमुळे हे मतदान चर्चेत आले आले.. 

महापालिका, जिल्हा परिषद सदस्यांना पक्षादेश जारी, २२ जूनला मतमोजणी..

बिनविरोध निवडणुकीमुळे चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या राज्यातील ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे. सकाळी आठ ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान होईल. मतदानाची  प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

मुंबई : मतदानाची  प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान होणाऱ्या मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात दुरंगी, सात ठिकाणी तिरंगी तर एका मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ मे रोजी निवडणूक जाहीर केली होती. या १७ जागांमध्ये नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ४ जूनला सहा मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता ११ जागांसाठी मतदान होणार आहे.या निवडणुकीची मतमोजणी २२ जूनला होऊन निकाल घोषित केले जातील.

निवडणुकीतील मतदार

आजच्या निवडणुकीत    महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, कटक मंडळाचे सदस्य मतदान करणार आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मतदान करण्यासाठी संबंधित राजकीय पक्षाकडून    पक्षादेश जारी करण्यात आला आहे.    मतदारांना    निवडणुकीत पसंती क्रमाने मतदान करायचे आहे. अधिकृत उमेदवाराला    पहिल्या पसंतीचे मतदान करण्याची सूचना    राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारांना    केली आहे.

मतदारसंघ आणि कंसात मतदारांची संख्या

सोलापूर (६१६), सांगली-सातारा (८९५), नांदेड (४४६), भंडारा-गोंदिया (४५७), नाशिक (६१९), जळगाव (६३०), अमरावती (४५३), लातूर -धाराशीव-बीड    (९८८), परभणी-हिंगोली (४६६), छत्रपती संभाजीनगर -जालना(६३७) नागपूर (८३६)

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

अहिल्यानगर-प्राजक्त तनपुरे (भाजप) , ठाणे-रवींद्र फाटक (शिवसेना), यवतमाळ-दुष्यन्त चतुर्वेदी (शिवसेना), पुणे -विक्रम काकडे    (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ), रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग -अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली-अरुण लखानी (भाजप)

41
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.