राज्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानात मोठे बदल दिसून येत आहेत. एकीकडे दिवसभर उष्णतेचा पारा वाढला आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाने पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे..
पुणे : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पंजाब, हरयाणा राजस्थान या राज्यांमध्ये सध्या पश्चिमी चक्रावात आणि चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून जी पावसाला पोषक वातावरण तयार करणारी आहे. त्यातच राज्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानात मोठे बदल दिसून येत आहेत. एकीकडे दिवसभर उष्णतेचा पारा वाढला आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाने पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा कायम आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आलेत.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.