घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी राज्यभर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत असून जिल्हास्तरावर विशेष समित्याही स्थापन करण्यात येत आहेत..
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी संबंधित यंत्रणांना एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमित सुरू राहील, याबाबत नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, अशी ग्वाहीही विभागाने दिली आहे. मार्च महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.