मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील पारा ३८ अंश सेल्सिअस पार..

मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा (हिट वेव्ह) इशारा देण्यात आला असून पारा ३८ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे..

मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा (हिट वेव्ह) इशारा देण्यात आला असून पारा ३८ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुलाबा हवामान विभागाने या चारही जिल्ह्यांतील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान, फेब्रुवारीपासूनच उन्हाचे चटके बसत असून नागरिकांचा घामटा निघत आहे. सोमवारी मुंबईचा पारा ३८.०४ अंश सेल्सिअसवर पोहोचला.

मुंबईसह राज्यातील तापमानात वाढ होत असून मंगळवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील पारा ३७ अंश सेल्सिअस पार जाण्याचा इशारा कुलाबा हवामान विभागाने दिला आहे.‌ दरम्यान, ‘हिट वेव्ह’चा इशारा देण्यात आला असून दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शक्यतो घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन कुलाबा हवामान विभागाचे अधिकारी सुषमा नायर यांनी केले आहे. दोन आठवड्यापासून मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील तापमानात वाढ झाल्याने अंगांची लाही लाही होत आहे. त्यातच पुन्हा एकदा तापमानात वाढ होत असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे. दमट वातावरणामुळे उष्णतेचा त्रास अधिक जाणवू शकतो. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

48

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.