हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईतील बेकऱ्यांना इंधनाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिकेने कारवाईचा इशारा दिल्यानंतर ही दुर्लक्ष करणाऱ्या १०२ बेकरीचालकांना स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आली आहे. तर कारवाईचा इशारा देताच १७५ बेकरीचालकांनी लाकडाऐवजी इंधनाचा वापर करण्यास सुरुवात केली..
मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईतील बेकऱ्या आणि इतर व्यवसायांमध्ये लाकूड आणि कोळशाचा वापर बंद करण्याचे आदेश मुंबई पालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळाने दिले आहेत. उच्च न्यायालयानेही ९ जानेवारी २०२५ रोजी घेतलेल्या सुनावणीत ६ महिन्यांच्या मुदतीत लाकूड आणि कोळसा याऐवजी पर्यायी स्वच्छ इंधनाचा अवलंब करण्याचे आदेश व्यावसायिकांना दिले आहेत.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.