शरद पवार पुन्हा ब्रीच कँडीत दाखल..

महिनाभरात तिसऱ्यांदा रुग्णालयात जाण्याची वेळ..  'बाबा ऐकत नाहीत...' अशी सुप्रिया सुळेंची खंत.. 

शरद पवार यांना निर्जलीकरणाच्या त्रासामुळे पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिनाभरात तिसऱ्यांदा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी 'बाबा ऐकत नाहीत...' म्हणत खंत व्यक्त केली. 

सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (दि. २६) सोशल मीडियावर पोस्ट करत वडिलांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. डॉक्टरांनी प्रवास कमी करून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असतानाही शरद पवार कामातून विश्रांती घेत नसल्याचं सांगत त्यांनी काळजी व्यक्त केली. मात्र, पवार यांची प्रकृती ठीक असल्याचंही सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

त्यानंतर मुंबईत परतल्यावर ४ नोव्हेंबर रोजी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी छातीत संसर्ग झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली होती. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. पुढील उपचार घरीच सुरू ठेवण्याबरोबरच पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

आता २६ नोव्हेंबर रोजी निर्जलीकरणाच्या त्रासामुळे शरद पवार यांना पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिनाभरात तिसऱ्यांदा रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त होत असली, तरी त्यांची तब्येत ठीक असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

38
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.