डोंबिवली एमआयडीसीच्या पाण्यात सापडल्या अळ्या.. स्थानिक नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर..

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात घरातील नळातून आलेल्या पाण्यात अळ्या आढळल्याने स्थानिक नागरिक संतापले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे..

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात घरातील नळातून आलेल्या पाण्यात अळ्या आढळल्याने स्थानिक नागरिक संतापले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या दोन दिवसांपासून मिलापनगर आणि इतर निवासी भागात एमआयडीसीच्या पाइपलाइनमधून थेट घरात येणाऱ्या पाण्यात लालसर अळ्या दिसून येत आहेत.

मिलापनगरमधील बंगलो प्लॉट क्रमांक ‘आरएल-१३६’ मध्ये आणि आजूबाजूच्या बंगल्यात पण या लालसर अळ्या नळातून येत असल्याचे दिसत आहेत. या बंगल्यात राहणाऱ्या अश्विनी देशपांडे- कुलकर्णी यांना गेल्या दोन दिवसांपासून या लालसर अळ्या येत असल्याचे दिसत असल्याने त्यांनी मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव अरुण जोशी आणि कार्यकारिणी सदस्य राजू नलावडे यांना संपर्क करून हा प्रकार प्रत्यक्ष दाखविला. २४ तारखेला एमआयडीसी कार्यालयाला गुरू नानक जयंती निमित्ताने सुट्टी असल्याने त्यांच्या अधिकाऱ्यांना मेसेजद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

एक महिन्यापूर्वी एमआयडीसीच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याचे प्रत्यक्ष दिसून आले होते. त्याची तक्रार एमआयडीसीकडे केल्यावर त्यांनी त्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. परंतु त्याच्या तपासणी अहवाल अद्याप सार्वजनिक जाहीर केला नाही किंवा रहिवाशी नागरिकांना त्याची माहिती दिली गेली नाही आहे.

38
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.