यामध्ये प्रामुख्याने हंगामी व्हायरल इन्फेक्शन, इन्फ्लूएंझासारखे आजार, गॅस्ट्रो तसेच डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉइडच्या सुरुवातीच्या रुग्णांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसानंतर ही रुग्णसंख्या प्रकर्षाने समोर आली असून रुग्णांमध्ये ताप, खोकला, घशात खवखव, अंगदुखी आणि थकवा अशी लक्षणे दिसत आहेत. यामध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींना सर्वाधिक फटका बसला आहे..
कामावर जाणाऱ्या प्रौढ व्यक्तींमध्येही ही वाढ झाली आहे.. व्हायरल इन्फेक्शन वाढल्याने हात स्वच्छ ठेवणे, हायड्रेटेड राहणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, उकळलेले पाणी पिणे, ताज्या घरगुती अन्नाचे सेवन करणे आणि लक्षणे दोन दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास वैद्यकीय उपचार घेणे असा सल्ला विविध डॉक्टर मंडळी देत आहेत..
मुंबई आणि उपनगरांत पावसामुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे रुग्णसंख्येत 30 टक्के वाढ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी असेही डॉक्टर म्हणत आहेत. कुठलाही आजार जास्त दिवस अंगावर न काढता लगेच डॉक्टरकडे जावे व व्यवस्थित औषधोपचार करून घ्यावा असे डॉक्टर म्हणत आहेत..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.