विद्यार्थी तोच.. शाळाही तीच.. तरी पुन्हा नव्याने प्रवेश आणि भरमसाठ फी.. ??

आपल्याला पालक म्हणून काय वाटते.. ??

शब्द खड्गच्या मंचावरून आम्ही सतत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करीत आलेले आहोत.. काही मंडळी याकामी पुढे येऊन त्यांची स्पष्ट मते मांडतात तर काही मंडळी मूग गिळून गप्प बसतात, आणि लोकांचा फायदा झाला तर आपलाही होईल या विचाराची असतात. मुळात आज रोजी नव्वद टक्के खासगी शाळांमध्ये अगदी सगळ्याच बाबतीत मनमानी चाललेली दिसते. गोरगरीब पालकांना आपली मुले शाळेत शिकविणे परवडेनासे झाल्याचे चित्र आहे. शाळेचा रोज नवा फतवा येतो.. आज यासाठी पैसे द्या  तर उद्या त्यासाठी पैसे द्या..  विशेष म्हणजे तीच शाळा.. तोच विद्यार्थी.. फक्त हा विद्यार्थी पुढच्या वर्गात जातो.. पण, बहुतांश शाळा यासाठी सुद्धा नव्याने प्रवेश देऊन पैसे उकळतात.. खासगी शाळा तर ते सांगतील त्याच दुकानांतून वह्या, पुस्तके आणि ड्रेस घेण्याचे बंधन घालतात.. या ठिकाणी शाळेला कमिशन मिळते हे सर्वांना ठाऊक आहे. या गोष्टीवर आणि मुलांच्या फी वर शिक्षण खाते आणि सरकारने नियंत्रण ठेवायला हवे.. मग शाळा सरकारी असो अथवा खासगी.. गरीब पालक काय करतील..?? त्यात विशेष मुलांच्या ज्या खासगी शाळा असतात त्यांची फी तर सर्वसामान्य पालकांच्या आवाक्या बाहेरची असते. मात्र, आपल्या मुलाला कसेही करून बरे वाटावे आणि शिकता यावे यासाठी पालक जीवाचे रान करतात..

या शाळा स्वतःचा मोठेपणा करण्यासाठी वर्ग चकचकीत करून ठेवतात आणि आपण हे करू आपण ते करू अशा बढाया मारून पालकांकडून पैसे उकळतात.. मुळात साध्या जागेतही शिक्षण घेता आणि देता येते.. साधी जागा म्हणजे सुटसुटीत वर्ग, वीज, पाणी आणि टॉयलेटची चांगली सोय.. आज बऱ्याच खासगी शाळांमध्ये जर तुम्ही फेरफटका मारलात तर किती शिक्षक शिक्षिका शिक्षण क्षेत्रातील पदवीधारक आहेत म्हणजे डीएड, बीएड आहेत हे बघणे गरजेचे वाटते.. कुणीही उठून शिकवीत सुटतो आणि चकचकीतपणा पाहून पालकांना वाटते की खासगी शाळा आहे चांगली असेल.. पण ही चांगली असेल ही गोष्टच आपला विश्वासघात करते.. पालक, जाणकार आणि शिक्षण खाते, सरकार, महानगरपालिका अशा अनेकांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन शाळकरी मुलांची एकूणच फी कमी केली तर खूप छान  होईल.. पालक म्हणून तुम्हाला काय वाटते या बद्दल बिनधास्त आपली मते मांडा..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

130
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.