पुणे जिल्हा मध्ये आळंदी येथे 13 वी युनिफाईड राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन, युनिफाईट अससोसिएशन (महाराष्ट्र )यांच्या मार्फत दिनांक 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले होते.
अससोसिएशन चे प्रमुख पदाधिकारी सौं स्मिता पनवेलकर, श्री Dr मंदार पनवेलकर, श्री संतोष खंदारे, श्री प्रशांत गंगर्डे याच्या अध्यक्षते खाली महाराष्ट्रातील विविध भागातून पुणे,नाशिक,रायगड ,पनवेल,मुंबई,लातूर,नाशिक डोंबिवली अशा अनेक ठिकाणाहून आलेल्या अनेक संघांनी भाग घेतला होता. ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मधील युनिटी मार्शल आर्ट सेंटर (युमॅक )या संघाच्या खेळाडूंनी सर्व राज्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
युनिटी मार्शल आर्ट्स सेंटर डोंबिवली येथील ग्रँडमास्टर श्री सुनील वडके सर,प्रशिक्षक श्री सचिन चौधरी सर, ( 5 डॅन ब्लॅक बेल्ट ) श्री राजेश मोरे सर ( 3 डॅन ब्लॅक बेल्ट ) तसेच ऋचा घाडीगावकर मॅडम,सारिका मांजरेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी 21 सुवर्ण पदके, 23 रौप्य पदके, 33 कांस्य पदके, मिळवण्यात यश प्राप्त केले आहे . शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक जाधव यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. डोंबिवली परिसर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत या मुलांवर आणि त्यांच्या प्रशिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..
- दिनकर सोमासे. फोटोग्राफर. शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.