रविवार दिनांक 21 जून 2026 आंतरराष्ट्रीय योग्य दिनाचे महत्व लक्षात घेता जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट च्या एसएनडीटी महिला महाविद्यालय कल्याण येथील विद्यार्थिनींनी महाविद्यालयात विविध प्रकारच्या योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले..
महिला - मुली आणि एकूणच अगदी सर्वांच्याच शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगासने खूप महत्वाची आहेत असे मार्गदर्शन प्र. प्राचार्य डॉ. सुनील घाटगे सर व प्रा. डॉ. सुनिल पवार सर, यांनी मुलींना केले. या प्रसंगी योग प्रशिक्षक मानसी मोरे आणि प्राध्यापक मंडळी तथा वाचनालय प्रमुख संकल्प गजबे सर उपस्थित होते. मानसी मोरे यांनी मुलींकडून योगासने करून घेतली.. महिला आणिमुलींची रोजचे जीवन जगतांना तारेवरची कसरत होत असते. कामाचा व्याप, अभ्यासाचा ताण, धावती जीवनशैली, वेळच्या वेळी जेवण करायला न जमणे यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असल्याने अगदी प्रत्येकीने आणि प्रत्येकाने रोज न चुकता स्वतःसाठी पंधरा मिनिटे काढून योगासने करावीत असे आवाहन या प्रसंगी प्रा. डॉ. सुनिल पवार आणि प्राचार्य डॉ. सुनील घाटगे सरांनी केले. या योग दिनाला मुलींनी भरभरून प्रतिसाद दिला..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.