शरद पवार ॲक्शन मोडवर.. भाजपा कडून राज्यात ‘ऑपरेशन तुतारी’ची शक्यता..

उद्धव ठारेंच्या शिवसेनेचे आमदार, खासदार फोडल्या नंतर आता भाजपचे लक्ष शरद पवारांचा राष्ट्रवादी संपविण्याकडे लागले आहे.. 

आणि विशेष म्हणजे हे काम अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे म्हणजे सुनेत्रा वाहिनीच्या राष्ट्रवादीकडे देणार असल्याची शक्यता आहे असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. शरद पवारांच्या आठ खासदारांपैकी सहा खासदार भाजपा गालाला लावण्याच्या प्रयत्नात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे..  उद्धव ठाकरेंचे आमदार खासदार फोडल्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनीही स्वीकारली आहे. आता शरद पवार गटाचे मन वळविण्याचे काम सुनेत्रा वहिनींकडे दिले आहे असे कळते.. 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोकसभेत आठ खासदार आहेत.त्यात सुप्रिया सुळे (बारामती), अमोल कोल्हे (शिरूर), नीलेश लंके (अहिल्यानगर), भास्कर भगरे (दिंडोरी), धैर्यशील मोहिते-पाटील (माढा). बजरंग सोनावणे (बीड), सुरेश म्हात्रे (भिवंडी) आणि अमर काळे (वर्धा) यांचा समावेश आहे. यापैकी सुळे आणि कोल्हे वगळता अन्य खासदार शरद पवार गटाची  साथ सोडू शकतात किंवा कसे याची चाचपणी सध्या सुरु आहे. ही चाचपणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मोहिमेला वेग दिला जाण्याची शक्यता आहे.

शरद पवार म्हणजे काही उद्धव ठाकरे नाहीत.. हे असेच घडेल याची कल्पना पवार साहेबांना असल्याने ते आता पुढे काय करतील, कुठले पाऊल  टाकतील की, राष्ट्रवादी राहुल काँग्रेस मध्ये विलीन करतील ?  हे येत्या काळात बघणे रंजक ठरणार आहे..

54
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.