पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट. अजित पवार राष्ट्रवादीत सर्व आलबेल नसल्याची चर्चा..

शनिवारी जवळपास दीड तास पार्थ पवार तेथे होते. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, नेते जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या भेटीगाठीच्या सत्रामुळे नजीकच्या काळात राष्ट्रवादीत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत..

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि नेते पार्थ पवार यांच्या कार्यशैलीने प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आदी पक्षाचे ज्येष्ठ नेते दुखावले गेले आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत असलेल्या नेत्यांना निर्णयप्रक्रियेत स्थान दिले जात नसल्याने या नेत्यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. या नाराज नेत्यांनी काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ब्रिच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यामुळे दिवाळीनंतर अजित पवार गटात मोठा धमाका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी आज शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी अजित पवार गटातील राजकीय घडामोडी आणि संभाव्य विलीनीकरण यावर चर्चा झाल्याचे समजते. दोन्ही गटांचे विलीनीकरण झाल्यास अजित पवार गटातील फूट टळू शकते, असे शरद पवार यांच्याकडून पार्थ पवार यांना सांगण्यात आल्याचे समजते.

विलीनीकरणाबाबत माहिती नाही - मुख्यमंत्री

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आजतरी आम्हाला कोणतीही माहिती दिलेली नाही. तशी चर्चा सुरू झाल्यावर ते सांगतील, तेव्हा आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरमध्ये सांगितले. ते दोन स्वतंत्र पक्ष आहेत. त्यांचे निर्णय ते स्वतः घेतील.

54
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.