खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीच्या पिंपळेश्वर मंदिरात पक्ष प्रवेश..
धात्रक कुटुंबियांच्या सोबतच श्रीकर चौधरी, प्रमिला चौधरी, उबाठाचे उपजिल्हाप्रमुख योगेंद्र भोईर यांच्यासह शंभर एक महिला - पुरुष कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशाने कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना आणखी बळकट झाल्याच्या भावना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केल्या. या सर्व लोकांना सामाजिक कामाचा अनुभव आहे असे सांगून श्रीकांत शिंदे यांनी सर्व पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले आहे. या पक्षप्रवेशाने कल्याण-डोंबिवलीत शिंदे सेनेची ताकद वाढत असल्याच्या प्रतिक्रिया परिसरातून येत आहेत..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.