नेपाळमध्ये दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; माऊंट एव्हरेस्टजवळ लँडिंगवेळी मोठी दुर्घटना, एका भारतीयाचा मृत्यू,.

नेपाळमध्ये माऊंट एव्हरेस्टजवळ दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक होऊन भीषण अपघात झाला. मंगळवारी (दि. ३) सकाळी लँडिंगचा प्रयत्न करताना ही घटना घडली. या अपघातात एका भारतीय पर्यटकाचा मृत्यू झाला, तर भारतीय वंशाच्या न्यूझीलंडमधील रहिवाशासह दोन्ही हेलिकॉप्टरचे वैमानिक असे तिघे जखमी झाले. या दुर्घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही..

अपघात कसा घडला?

नेपाळमधील सोलुखुंबू जिल्ह्यातील खुंबू पासांग ल्हामू ग्रामीण नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील फेरिचे येथे हा अपघात झाला. स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे ८ वाजून ११ मिनिटांनी दोन हेलिकॉप्टर एकाच वेळी उतरण्याचा प्रयत्न करत होती. याचदरम्यान त्यांची एकमेकांशी धडक झाली.

भारतीय वंशाच्या न्यूझीलंड रहिवाशासह तिघे जखमी

या दुर्घटनेत भारतीय वंशाचे ४९ वर्षीय शैलेश कृष्णा पटेल हेही जखमी झाले आहेत. ते न्यूझीलंडचे रहिवासी असून बाळारामारामाडू यांच्यासोबत फिशटेल एअरच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. अपघातानंतर त्यांना प्रभू हेलिकॉप्टरच्या मदतीने एअरलिफ्ट करण्यात आले. पुढील उपचारांसाठी काठमांडू येथील मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

46

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.