भारतासोबतचा व्यापार आता फायद्यात- ट्रम्प..

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे अत्यंत चांगले मित्र असून अमेरिका आणि भारत यांच्यात लवकरच एक मोठा व्यापारी करार होईल, असा ठाम विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. आता आपण भारतासोबतच्या व्यापारात चांगला नफा कमावत आहोत, असा दावा ट्रम्प यांनी केला..

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे अत्यंत चांगले मित्र असून अमेरिका आणि भारत यांच्यात लवकरच एक मोठा व्यापारी करार होईल, असा ठाम विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. आता आपण भारतासोबतच्या व्यापारात चांगला नफा कमावत आहोत, असा दावा ट्रम्प यांनी केला.

ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, आमच्यात नक्कीच एक व्यापारी करार होईल, कारण मला तुमचे पंतप्रधान खूप आवडतात. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. आमचे संबंध अतिशय उत्तम आहेत आणि आम्ही मिळून हा करार पूर्ण करू.

दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या व्यापारी कराराच्या वाटाघाटींबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी जुन्या धोरणांवर बोट ठेवले. ते म्हणाले की, भारताने अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या मवाळ धोरणांचा फायदा घेतला असून अमेरिकन उत्पादनांवर प्रचंड प्रमाणात आयात शुल्क (टॅरिफ) लावले होते. भारताने आमच्या कंपन्यांवर प्रचंड शुल्क आकारले, तर आम्ही त्यांच्याकडून काहीच आकारत नव्हतो, असे ट्रम्प म्हणाले.

पहिल्या टप्प्यातील करार जुलैपर्यंत - गोयल

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित कराराचा 'पहिला टप्पा' पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी दिली. या करारामुळे जागतिक बाजारपेठेतील आपल्या इतर स्पर्धकांच्या तुलनेत भारताला बाजारपेठ आणि संधी यामध्ये प्राधान्य दिले जाईल.

50

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.