सुरक्षा दलाच्या चौकीवर दहशतवाद्यांचा गोळीबार; CRPF चे तीन जवान जखमी..

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) चौकीवर अचानक अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान गंभीर जखमी झाले असून, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले..

श्रीनगर : बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मीर बाजार परिसराजवळ ही घटना घडली. हे ठिकाण जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.

41
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.