कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर Gen Z ला उद्देशून केलेले पंतप्रधानांचे हे पहिले थेट संबोधन होते..
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत फेसबुक खात्यावर जनरेशन झेड (Gen Z) ला उद्देशून पोस्ट केलेला व्हिडिओ काही काळासाठी हटवल्याप्रकरणी मेटा (Meta) कंपनीने मंगळवारी (दि. २८) माफी मागितली आहे. तांत्रिक त्रुटीमुळे हा व्हिडिओ चुकून हटविण्यात आल्याचे सांगत कंपनीने स्पष्टीकरण दिले.
सरकारकडून गंभीर दखल
आयएएनएसच्या वृत्तानुसार, या घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मेटा आणि इन्स्टाग्रामच्या जागतिक अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे. पंतप्रधानांच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टवर निर्बंध कसे आले, याबाबत सरकारकडून सविस्तर स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ जुलै रोजी एक सेल्फी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर Gen Z ला उद्देशून केलेले पंतप्रधानांचे हे पहिले थेट संबोधन होते. या भाषणात त्यांनी, "पेपरफुटीविरोधात अधिक कठोर उपाययोजनांची घोषणा उद्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली जाईल,"असे आश्वासन दिले होते.
मंगळवारी पहाटे अनेक युजर्सना पंतप्रधान मोदींचा फेसबुक व्हिडिओ उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.