इराणविरोधात अमेरिका, इस्रायलने सुरू केलेल्या युद्धामुळे घरगुती गॅसच्या किमती वाढल्या..
इराणविरोधात अमेरिका, इस्रायलने सुरू केलेल्या हल्ल्याचे पडसाद थेट भारतीयांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहेत. आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या दुसऱ्या सिलिंडरसाठी १५ दिवसांचा कालावधी बदलून आता तो २५ दिवसांचा करण्यात आला आहे...
केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडर महिनाभरातून एकच देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तेल कंपन्यांनी घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या प्रति सिलिंडरच्या (वजन १४.२ किलो) किमतीत शनिवारी ६० रुपयांची वाढ केली. ही दरवाढ तत्काळ लागू करण्यात आली. गेल्या ११ महिन्यांत झालेली ही दुसरी दरवाढ आहे. लाभार्थी उज्ज्वला योजनेचे असलेल्या व २०१६ पासून मोफत एलपीजी कनेक्शन मिळालेल्या १० कोटींहून अधिक गरीब कुटुंबांनादेखील ही दरवाढ सहन करावी लागेल.
सिलिंडर महिन्यातून एकच देण्याबाबत सूचना
नागरिकांना घरात दोन एलपीजी सिलिंडर वापरण्याची परवानगी असते. त्यासाठी पहिला सिलिंडर घेतल्यानंतर दुसऱ्या सिलिंडरसाठी १५ दिवसांनी अर्ज करता येत होता. आता अचानक हा कालावधी वाढवण्यात आला आहे. आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडर महिनाभरातून एकच देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.