अंधभक्त अभिजित दिपके ला त्रास देण्यासाठी पुढे सरसावले आहेत..
RTI कार्यकर्ता अमित तिवारी यांनी अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या अमेरिकेतील उच्च शिक्षणाचा खर्च कसा भागविण्यात आला, असा प्रश्न सुरतमधील माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते अमित तिवारी यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोग, महाराष्ट्र सरकार आणि कर विभागाकडे चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
CJP च्या कायदेशीर अस्तित्वावर प्रश्न
अमित तिवारी यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या निवेदनात, सीजेपी ही जनप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम २९अ अंतर्गत नोंदणीकृत राजकीय पक्ष नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. अशा परिस्थितीत ही संघटना राजकीय पक्ष म्हणून कार्य करू शकते का आणि निधी स्वीकारू किंवा गोळा करू शकते का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी सीजेपीच्या आंदोलनकर्त्यांसाठी जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या कायदेशीर मदत निधीचाही त्यांनी उल्लेख केला असून, हा निधी नोंदणीकृत नसलेल्या संघटनेला स्वीकारता येतो का, याची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.
अभिजीत बाबतीत या सर्व चौकशा करण्या अगोदर भाजपच्या मंत्र्या संत्र्यांची संपत्ती किती आहे व हे पैसे त्यांनी कुठून आणि कसे जमविले या बद्दल सीजेपी च्या सेलने माहिती अधिकारात ही माहिती मिळवावी असे सर्वसामान्य लोकांचे म्हणणे आहे..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.