९ वर्षांचा संसार, पण मूल नाही; पत्नीचा गळा चिरून पतीनेही संपवले जीवन..

मुरादाबादमध्ये कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला ९ वर्षे होऊनही अपत्य नसल्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद वाढत गेला. अखेर संतापाच्या भरात पतीने पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही वार करून जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे..

होळीच्या निमित्ताने बाहेर पडले, पण...

मृत व्यक्तींची ओळख विनोद उर्फ विकी आणि ममता अशी झाली असून ते मुरादाबादमधील सिव्हिल लाईन्स परिसरातील नवीन नगर येथे राहत होते. बुधवारी (दि. ४) दुपारी सुमारे दोनच्या सुमारास विनोदने होळीच्या निमित्ताने सासरी जात असल्याचे सांगून ममताला सोबत घेतले. मात्र सासरी नेण्याऐवजी तो तिला सोनकपूर ओव्हरब्रिजजवळील निर्जन जंगलात घेऊन गेला. तेथे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच मुरादाबादचे एसपी सिटी कुमार रणविजय सिंह आणि माझोला पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक दुचाकी जप्त केली आहे. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

33

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.