ऊसाला ७९०० रुपये हमीभाव द्या! मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सत्यग्रह आंदोलन..किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा इशारा..

सांगली : आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, कोणाकडे भीक मागत नाही... या शब्दांत महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. ऊसाला ७९०० रुपये हमीभाव मिळावा, या मागणीसाठी साखर कारखान्यांना निवेदन देण्यात आले आहे..

सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे नुकसानच होत आले आहे. शासनाच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढले, आमदार-खासदारांचेही पगार वाढले, मात्र शेतकऱ्यांच्या ऊसाचे दर वाढले नाहीत, अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी कॉम्रेड विकास कदम यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने ऊसाला ७९०० रुपये हमीभाव मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

कॉम्रेड वैभव काका पवार यांच्या नेतृत्वाखाली दि. २०/११/२०२६ रोजी मुख्यमंत्रीयांच्या बंगल्यावरती सत्यग्रह आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा लढा अधिक तीव्र करण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

120
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.