महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरण परिसराला मध्यरात्री साडेबारा ते पहाटे चार या वेळेत सौम्य भूकंपाचे तब्बल पाच धक्के बसले. या भूकपांची तीव्रता २ ते २.५ रिश्टर स्केल एवढी होती. कमी तीव्रतेमुळे भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत..
सातारा : महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरण परिसराला मध्यरात्री साडेबारा ते पहाटे चार या वेळेत सौम्य भूकंपाचे तब्बल पाच धक्के बसले. या भूकपांची तीव्रता २ ते २.५ रिश्टर स्केल एवढी होती. कमी तीव्रतेमुळे भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत. दरम्यान, कोयनानगरचे भूकंप मापन केंद्र बंद असल्याने कोयना धरणापासून भूकंपांच्या केंद्रबिंदूचे अंतर, जमिनीतील खोली आणि अक्षांश, रेखांश याची नोंद होऊ शकली नाही.
कोयनानगर, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही केंद्रांवर भूकंपाची नोंद होते, त्याचवेळी भूकंपाच्या केंद्रबिंदूचे अंतर, त्याची खोली आणि अक्षांश, रेखांशाची अचूक माहिती मिळते. सध्या कोयनानगर येथील भूकंप मापन केंद्र बंद असल्याने सविस्तर नोंदी मिळू शकल्या नाहीत, अशी माहिती कोयनेच्या भूकंप मापन केंद्रातील अधिकारी किरण कानुगडे यांनी दिली.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.