साताऱ्यात मोबाईलच्या अतिवापराने संतापलेल्या पालकाने केली मुलीची हत्या..

मोबाईलचा अतिवापर, चुकीची संगत आणि आई-वडिलांशी उर्मटपणे बोलणे, शिवीगाळ करणे आदींमुळे संतापलेल्या वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीच्या डोक्यात बॅटने मारहाण करून तिची हत्या केली आहे. ही घटना साताऱ्यातील गोडोली परिसरात उघडकीस आली आहे..

आर्या पुरुषोत्तम कदम असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या प्रकरणी वडील पुरुषोत्तम कदम यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.

४ ऑक्टोबर रोजी आर्याला राहत्या घरातून बेशुद्ध अवस्थेत खासगी वाहनाने सातारा येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याबाबत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली भोसले यांनी सातारा शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

58
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.