डोंबिवली MIDC परिसरातील पाण्याची होणार तपासणी..आरोग्य विभागाची घरोघरी जाऊन पाहणी..

डोंबिवली एमआयडीसी परिसरात नळाच्या पाण्यात लालसर अळ्या आढळल्याच्या वृत्ताची कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. विविध प्रसारमाध्यमे, स्थानिक नागरिक व फेसबुक इत्यादी माध्यमांनी या दूषित पाण्या संदर्भात जोरदार आवाज उठविल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला जाग आली व बुधवारी, २५ नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने मिलापनगर परिसरात पाहणी केली..

मिलापनगर येथील आरएल-१३६ क्रमांकाच्या बंगल्यात पाण्यात अळ्या आढळल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास केडीएमसीच्या आरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तसेच मिलापनगर आणि आजूबाजूच्या निवासी परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांची चौकशी केली. परिसरातील रहिवाशांना साथीचे किंवा इतर जलजन्य आजार झाले आहेत का, याची माहितीही संकलित करण्यात आली.

आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता हुले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक भाऊसाहेब हरणे आणि त्यांच्या पथकाने ही पाहणी केली. गुरुवारीही परिसरात पाहणी सुरू ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या आरोग्य विभागानेही या प्रकाराची दखल घेत स्थानिक प्राधिकरणांकडून अहवाल आणि माहिती मागविण्याची तयारी केल्याचे समजते.

मंगळवारी एमआयडीसीकडून पुरवठा होणाऱ्या पाण्यात लालसर अळ्या आढळल्यानंतर एमआयडीसी प्रशासनानेही पाण्याचे नमुने घेतले होते. बुधवारी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता श्रीकांत राऊत आणि केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता हुले यांनी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. पाण्याच्या वाहिन्या आणि साठवण टाक्यांचे तातडीने ऑडिट करण्यात यावे. तपासणीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालाकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

फक्त MIDC च नाहीतर डोंबिवलीतील बहुतांश भागांत पाणी खराब येत असल्याने महानगरपालिके एकूणच पाणी स्वछ्तेबाबत ठोस पावले उचलावीत अशी नागरिक मागणी करीत आहेत..

55
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.